मुंबई महापालिका निवडणुकीमुळे मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मुंबई महापालिकेत अधिका अधिक जागा जिंकण्यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. भाजपकडूनही मुंबई निवडणुकीसाठी रणनिती आखण्यात आली असून त्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहे. मात्र, राज्य निवडणूक आयोगाने घेतलेल्या एका निर्णयामुळे भाजपला ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसला आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपने मोठ्या उत्साहात तयार केलेले विशेष प्रचार गीत वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या गीतामध्ये भगवा या शब्दाचा वापर केल्याने निवडणूक आयोगाने आचारसंहिता उल्लंघन केल्याचा ठपका ठेवला असून, या प्रचाराला गीताला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे आता भाजपकडून नवीन गीत तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.
राज्यातील २९ महापालिका निवडणुकीसाठी धुरळा उडला असून, सर्वच ठिकाणी भाजपकडून जोरदार शक्तीप्रदर्शन केले जात आहे. रॅली, सभांचा धडाका सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: सभेला जात असून, भाजप उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन नागरिकांना करत आहेत. दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे देखील प्रचार सभेतून लोकांना आश्वात करताना दिसत आहेत.
या निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान तर १६ जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. भाजपने मुंबई महापालिका निवडणुकीसाठी कंबर कसली असून, जोरदार प्रचारमोहीम राबविली आहे. प्रचारासाठी भाजपने खास गीत तयार केले होते. पण आयोगाने गीतामधील भगवा या शब्दामुळे हे गीत नाकारले आहे. आता भाजपला पुन्हा एकदा नव्याने प्रचारगीत तयार करावे लागणार आहे.















Discussion about this post