मुंबई : राज्यातल्या राजकीय वर्तुळात एक खळबळ उडवून देणारी बातमी समोर आलीय. ती म्हणजेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ट्विटरवरून अज्ञात व्यक्तीने ही धमकी दिली आहे.
यानंतर राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ मुंबई पोलीस आयुक्तांच्या भेटीला गेले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ भेटीसाठी पोहोचलं आहे. जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या ट्विटर हँडलवर कारवाई करावी या मागणीसाठी शिष्टमंडळ पोलीस आयुक्त कार्यालयात गेल्या आहेत. खासदार सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळासह गेल्या होत्या.
शरद पवारांना मिळालेल्या धमकीचा सखोल तपास केला पाहिजे. महाराष्ट्रात दडपशाही आणि गुंडाराज सुरू आहे. मी देशाच्या गृहमंत्र्यांकडे न्याय मागत आहे. भविष्यात काही बरं वाईट झाल्यास त्याला जबाबदार देशाचे आणि राज्याच्या गृहमंत्री जबाबदार आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर तक्रारीची दखल करत कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
Discussion about this post