मुंबई । चित्रपटसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ‘द ट्रायल’ या वेब सीरिजमध्ये काजोलसोबत काम करणारी अभिनेत्री आणि कतार एअरवेजची माजी एअर होस्टेस नूर मलाबिका दास यांचे निधन झाले आहे. अभिनेत्री तिच्या मुंबईतील घरात मृतावस्थेत आढळून आली. फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. नूर मालाबिका दास हिने ओढणीच्या मदतीने पंख्याला गळफास घेतला. इतक्या लहान वयात अभिनेत्रीच्या आकस्मिक निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे.
नूर मालाबिका दास हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या. हेच नाही तर अभिनेत्री काजोल हिच्यासोबत वेब सीरिजमध्येही काम केले. अभिनेत्रीच्या निधनाची बातमी कळताच चाहत्यांना धक्का बसलाय. हेच नाही तर अभिनेत्रीचे निधन तीन दिवसांपूर्वीच झाले. फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. नूर मालाबिका दास हिने ओढणीच्या मदतीने पंख्याला गळफास घेतला.
आता नूर मालाबिका दास हिच्या निधनानंतर अत्यंत मोठी माहिती पुढे येताना दिसत आहे. ओशिवरा पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अभिनेत्री काही दिवसांपासून नैराश्याने त्रस्त होती आणि हेच नाही तर नैराश्यासाठी औषधही नूर मालाबिका दास घेत होती. नैराश्यातूनच अभिनेत्रीने आत्महत्या केल्याचे सांगितले जातंय.
प्राथमिक तपासानुसार अभिनेत्रीने नैराश्यातूनच आत्महत्या केलीये. अजूनही पोलिस या प्रकरणात तपास करताना दिसत आहेत. काही मोठे खुलासे या प्रकरणात होऊ शकतात, अशीही चर्चा रंगताना दिसत आहे. नूर मालाबिका दास ही मुळ आसामची आहे. सोशल मीडियावर नूर मालाबिका दास सक्रिय असून आपल्या चाहत्यांसोबत प्रत्येक अपडेट शेअर करताना दिसत होती.
फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याचे शेजाऱ्यांनी सांगितल्यानंतर ओशिवारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. हेच नाही तर पोलिसांकडून अभिनेत्रीच्या कुटुंबियांसोबत संपर्क साधण्यात आला. मात्र, अभिनेत्रीचे कुटुंबिय मृतदेह घेण्यासाठी मुंबईमध्ये पोहचले नाहीत.शेवटी पोलिसांनीच नूर मालाबिका दास हिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.
Discussion about this post