मित्र मैत्रिणींसह रायगड मधील माणगाव येथे गेलेल्या प्रसिद्ध ‘रील स्टार’आणि ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सरचा दरीत कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला झाल्याची घटना समोर आली आहे. अन्वी कामदार असे तिचे नाव असून ती मुंबईतील रहिवासी आहे.
माणगाव पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील मुलुंड येथे राहणारी अन्वी पावसाळ्यात मित्र- मैत्रिणींसोबत फिरायला गेली होती. सात जणांचा हा ग्रुप धबधब्यावर आला होता. मात्र त्यावेळीच अन्वी हीचा पाय घसरून दरीत कोसळली आणि तिचा मृत्यू झाला. व्यवसायाने सीए असलेली अन्वी तिच्या सोशल मीडिया रिल्ससाठी प्रसिद्ध होती.
दरी खोल असल्याने बचाव कार्यात अडथळा येत होता. त्यानंतर तब्बल 6 तासांच्या रेस्क्यूनंतर अवनीला बाहेर काढण्यात आलं. ती गंभीर जखमी झाली होती. तिला तात्काळ माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
Discussion about this post