मालेगाव । राज्यातील अनेक भागात पाणीटंचाई जाणवू लागली असून नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत असल्याचे दिसत आहे. मात्र अशातच नाशिकच्या मालेगाव तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. पाणी भरण्यासाठी आणि कपडे धुण्यासाठी गेलेल्या माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विहिरीतील पाणी ओढताना पाय घसरून दोघीही विहित पडल्या आणि यातच त्यांचा मृत्यू झाला आहे. उन्हाच्या झळा वाढल्यामुळे या भागात पाण्याची टंचाई आहे. यातूनच या मायलेकीचा मृत्यू झाल्याची बोललं जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, पाणीटंचाईमुळे निताबाई जाधव व त्यांची मुलगी इच्छामणी या दुपारच्या सुमारास गावाजवळील विहिरीत पाणी आणण्यासाठी आणि कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी पाणी विहिरीतून ओढताना पाय घसरून दोघीही विहिरीत पडल्या आणि यातच त्यांचा मृत्यू झाला. सायंकाळी शेळ्या-मेंढ्या चारणारे घराकडे येत असतांना त्यांच्या हा प्रकार लक्षात आला. हा प्रकारत त्यांनी गावातील नागरिकांना सांगितला. गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत माय-लेकींचे मृतदेह बाहेर काढले. याप्रकरणी तालुका पोलिस्थानका आकस्मित मृत्यूची नोंद झाली आहे.















Discussion about this post