जळगाव । काँग्रेसचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या कन्या डॉ. केतकी पाटील लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील. मोदी यांच्या नाशिक दौऱ्यानंतर त्यांच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरणार आहे.
एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेल्यामुळे रावेरच्या भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना पक्ष उमेदवारी देणार नाही, हे निश्चित मानले जाते आहे. त्या पार्श्वभूमीवर कोणाला उमेदवारी मिळेल ही उत्सुकताही आहे. त्या पार्श्वभूमीवर डॉ. केतकी पाटील भाजपत प्रवेश करतील अशी चर्चा होती; मात्र डॉ. उल्हास पाटील यांच्याकडून काँग्रेसच्या उमेदवारीबाबतही पडताळणी सुरू होती; मात्र भाजपच्या नेत्यांबरोबर त्यांची एक बैठक झाली असून, त्यात डॉ. केतकी यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. दरम्यान १२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक येथे येत असून त्यानंतर डॉ. पाटील यांचा पक्ष प्रवेशाचा मुहूर्त जाहीर केला जाईल, असे देखील सांगण्यात आले.















Discussion about this post