मुंबई । महाराष्ट्रातील 29 महापालिका निवडणुकांची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने आज सोमवारी (दि. 15 डिसेंबर) केली. त्यानुसार 15 जानेवारी 2026 रोजी निवडणूकीसाठी मतदान होणार असून, दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार आहे. या घोषणेसह या महापालिकांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.
मुदत संपलेल्या २७ आणि २ नव्या महापालिकेच्या निवडणुकीची घोषणा आज आयोगाकडून करण्यात आली. राज्य निवडणूक आयोगाचे अध्यक्ष दिनेश वाघमारे यांनी सांगितलं की, ‘उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र ऑफलाइन घेण्यात येईल. यासाठी राजकीय पक्षांची बैठक झाली होती. त्यात मागणी केली होती.
जातवैधता पडताळणीसाठी राखीव गटाच्या उमेदवारांना जात वैधता आणि जात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असणार आहे. त्यासाठी सादर अर्जाची सत्यप्रत किंवा अन्य पुरावा दिला तरी स्वीकारला जाईल. सहा महिन्याच्या आत सादर करण्याचे हमीपत्र आणि सादर न केल्यास उमेदवाराची निवड रद्द होईल’.
निवडणूक कार्यक्रम –
उमेदवारी अर्ज स्वाकीरणे – २३ डिसेंबर – ३० डिसेंबर
छाननी – ३१ डिसेंबर २०२५
उमेदवारी माघार – २ जानेवारी २०२६
चिन्ह वाटप – अंतिम उमेदवार यादी – ३ जानेवारी २०२६
मतदान – १५ जानेवारी २०२६
निकाल – १६ जानेवारी २०२६















Discussion about this post