भुसावळ : दानापूर-पुणे एक्स्प्रेसमध्ये तोतया टीसीला भुसावळ विभागातील टीसींनी पकडले. ही घटना १२ रोजी अहमदनगर येथे घडली. सचिन संजय दिवाकर (दौंड, पुणे) असे या अटक केलेल्या तोतया टी.सी.चे नाव आहे.
भुसावळ रेल्वे विभागाचे तिकीट तपासनीस अवधेश कुमार आणि जी. टी. साबरे १२ रोजी ट्रेन क्र. १२१५० भुसावळ-पुणे दरम्यान कार्यरत होते. त्याचवेळी याच रेल्वेत एक बोगस टीसी प्रवाशांकडील तिकीट तपासणी करून पैसे जमा करीत असल्याची माहिती वाणिज्य नियंत्रण पुणे यांच्याकडून मिळाली.
अहमदनगर येथे रेल्वे आल्यानंतर, एस फाईव्ह या कोचमध्ये तो प्रवाशांचे तिकीट तपासणी करत होता. त्याचवेळी भुसावळ विभागाच्या टीसींनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे प्रवाशांकडून घेतलेले हजार रुपये आढळून आले. यानंतर त्याला पॅन्ट्री कारमध्ये नेण्यात आले. वाणिज्य नियंत्रण पुणे यांना माहिती देण्यात आली आणि तोतया तिकीट तपासणी करणाऱ्यास पुढील कारवाईसाठी दौंड रेल्वे कर्मचाऱ्यांच्या स्वाधीन करण्यात आले.
Discussion about this post