पुणे : अपघाताच्या घटना प्रचंड वाढल्या असून यात अनेकांना जीववार मोकावे लागले आहे. अशातच पुण्यातील कात्रज मधून अपघाताची एक हृदय हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. डंपरने आधी एका स्कुटरला धडक दिली. नंतर एका चिमुकल्याला चिरडलं. आईच्या डोळ्यासमोरच डंपरने चिमुकल्याला चिरडलं अन् आईने टाहो फोडला.
डंपर चालकाने गाडी बाजूला लावली आणि गाडी सोडून पळून गेला. अंगावर काटा आणणाऱ्या या घटनेमुळे स्थानिक संतप्त झाले. संतप्त झालेल्या जमावाने डंपर पेटवून दिला.
पु्ण्यातील मंतरवाडी कात्रज बायपास रस्त्यावर भरधाव वेगाने येणा-या डंपरने अॅक्टीव्हा स्कुटरला धडक दिली. या स्कुटरवर कु.शौर्य सागर आव्हाळे वय वर्षे 8 हा आईसोबत जात होता.
पण डंपरच्या धडकेने तो रस्त्यावर पडला. आईसमोरच डंपरने मुलाला चिरडले आणि शौर्यचा जागीच मृ्त्यू झाला. या घटनेने संपुर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शौर्य सागर आव्हाळे याचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी ससूनमध्ये पाठवण्यात आला आहे.संतप्त झालेल्या जमावाने डंपर पेटवून दिला.















Discussion about this post