जळगाव । जळगाव जिल्ह्यात कोसळधार सुरू असून या परतीच्या पावसाने शेतीचे आणि पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून आले आहे. आस्मानी संकटामुळे शेतकऱ्याचा हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यामूळे बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.
जळगाव जिल्ह्यासह रावेर तालुक्यात परतीच्या पावसामुळे कापूस, मका, ज्वारी, तूर या खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. काल झालेल्या मुसळधार पावसामुळे खरीप पिकांना मोठा फटका बसला. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पीक जमीनदोस्त झाले. शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास हिरवला गेला. दरम्यान तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकर्यांकडून केली जात आहे.
केळीची झाडं कोलमडली
जळगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे केळी पिकासह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. वादळी वाऱ्यासह पावसामुळे चिंचोली उमाळा परिसरात एका शेतातील 1 हजार केळीचे झाडे कोलमडून पडल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले. सलग दोन दिवस आलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे काढणी, मळणीवर आलेल्या पिकांना मोठा फटका बसला. जळगाव तालुक्यातील धानवड , उमाळा चिंचोली तसेच विटनेर, जळके या परिसरात पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.
Discussion about this post