जळगाव । जिल्ह्यात रविवारी वादळासह झालेल्या अवकाळी पावसाने जामनेर, रावेर, यावल, मुक्ताईनगर व जळगाव तालुक्यात १७५४ हेक्टरवरील केळी पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. सर्वाधिक १ हजार हेक्टरवरील पिकांचे मुक्ताईनगर तालुक्यात नुकसान झाले आहे. रावेर तालुक्यात ५६५ हेक्टर, यावल तालुक्यात १२७ हेक्टर, जामनेर तालुक्यात ५४ हेक्टर तर जळगाव तालुक्यात ५ हेक्टर केळी पिकाचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात सवाधिक १७५८ हेक्टरवरील केळी पिकाचे नुकसान झाले आहे. या नुकसानीने मुक्ताईनगर तालुक्यातील सहा गावातील ६७८, रावेर तालुक्यातील २४ गावातील ६४३, यावल तालुक्यातील १९६ गावातील २२३, जामनेर तालुक्यातील दहा गावातील १७५ तर जळगाव तालुक्यातील तीन गावातील ११ शेतकरी बाधीत झाले आहेत
रेमाल चक्रीवादळामुळे नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा वेग वाढला
रेमाल चक्रीवादळामुळे नैऋत्य मोसमी वाऱ्याने वेग वाढलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात विविध भाग ढगांनी आच्छादला जात आहे. मान्सूनपूर्व हालचालींना देखील वेग मिळाला आहे. मातच जोड म्हणून प्रखर गर्मीमुळे तयार झालेले बाष्पयुक्त ढग देखोल समाविष्ट आहेत. या स्थितीमुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन जळगाव जिल्ह्यातील विविध ठिकाणी अचानक वादळ आणि पाऊस निर्माण होत आहेत.















Discussion about this post