नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता नो टेन्शन असणार आहे. अणुऊर्जा विभागात विविध पदांसाठी मोठी भरती सुरु आहे. यासाठी पात्र उमेदारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले जात आहे. .ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत असून नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावीत.
काही दिवसांपूर्वीच या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही देखील प्रसिद्ध करण्यात आलीये. आता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी अवघे दोनच दिवसच शिल्लक आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 29 एप्रिल 2024 आहे.अर्ज करण्यासाठी dae,gov.in या साईटवर जा.
या पदांसाठी होणार भरती
या भरतीद्वारे एकूण 24 जागा भरल्या जातील. सिनिअर अकाउंटंट, ज्युनिअर अकाउंटंट, व्हेरिएबल एनर्जी सायक्लोट्रॉन सेंटरमध्ये केअरटेकर, वरिष्ठ लेखापाल, कनिष्ठ लेखापाल अशी विविध पदे ही भरती प्रक्रियेतून भरली जाणार आहेत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे.
शिक्षणाची अट देखील पदानुसार लागू करण्यात आलीये, या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ही लागू करण्यात आलीये. 56 वयोगटापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. उमेदवाराची निवड ही परीक्षा आणि मुलाखतीमधून केली जाणार आहे. उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर अधिसूचना ही व्यवस्थितपणे वाचून घ्यावी आणि मगच अर्ज करावीत.















Discussion about this post