नवी दिल्ली : देशावर घोंगावणाऱ्या बिपरजॉय चक्रीवादळाने आता रौद्र रूप धारण केले असून या चक्रीवादळाचे धडकी भरवणारे व्हिडिओ आता समोर आले आहेत. दरम्यान, हे वादळ भारतीय किनारपट्टीच्या दिशेने सरकत असून गुरूवारी म्हणजेच उद्या गुजरातेतील कच्छ जिल्ह्यातील जखाऊ बंदराला येऊन धडकण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सरकारने त्या भागात रेड अलर्ट जारी केला आहे. तसेच वादळाचा फटका ज्या भागाला बसण्याची शक्यता आहे त्या भागातील नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर लावण्यात आले आहे. तर या चक्रीवादळाचे धडकी भरवणारे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.
#WATCH | High tidal waves hit Gujarat as cyclone 'Biporjoy' intensifies
(Visuals from Dwarka) pic.twitter.com/J6KfqJZmJd
— ANI (@ANI) June 14, 2023
सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ गुजरातेतील द्वारका येथील आहे. द्वारका येथील वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकण्यापूर्वी गजरातेत मुसळधार पावसाला सुरूवात झाली असून उद्या या चक्रीवादळाची तीव्रता आणखी वाढणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
https://twitter.com/GoGujarat_/status/1668655519945609216
केंद्र सरकार आणि राज्यांनी मिळून गेल्या 9 वर्षामध्ये अनेक आपत्तींना तोंड दिले आहे. या नवीन आपत्तीला तोंड देण्यासाठी सरकार पूर्णपणे तयार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे. ‘बिपरजॉय’ चक्रीवादळामुळे होणारे संभाव्य नुकसान कमी करणे हे आमचे उद्दिष्ट आहे असे शाह म्हणाले आहेत.
Discussion about this post