केंद्र शासनाची नोकरी करण्याची एक उत्तम संधी चालून आली आहे. नाशिकमधील करन्सी नोट प्रेसकडून भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेच्या तयारी लागावे.विशेष बाब म्हणजे उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा देण्याचे या भरती प्रक्रियेसाठी नो टेन्शन असणार आहे. चला तर जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल आणि अर्ज करण्याची पद्धत.
थेट करन्सी नोट प्रेसमध्ये नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे या भरती प्रक्रियेतून चिकित्सा अधिकाऱ्याची पदे ही भरली जाणार आहेत. एकून तीन पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला आॅफलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. 23 मार्च 2024 रोजी या भरती प्रक्रियेसाठी मुलाखती या पार पडणार आहेत.
पात्रता काय?
चिकित्सा अधिकारी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून एम.बी.बी.एसची पदवी असायला हवी. एम.बी.बी.एस असणाऱ्यांसाठी ही मोठी संधीच म्हणावी लागेल.
मिळणारे वेतन – 55,000/- ते 75,000/- रुपये दरमहा
मुलाखतीचे ठिकाण : चलार्थ पत्र मुद्रणालय, जेल रोड, नासिक (महाराष्ट्र) 422 101.
या भरती प्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी आपण https://cnpnashik.spmcil.com/en या साईटला भेट द्यावी, तिथेच आपल्याला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल.















Discussion about this post