दहावी पास उमेदवारांसाठी खुशखबर आहे सीआरपीएफ (CRPF) म्हणजे केंद्रीय राखीव पोलीस दलात नोकर भरती करण्यात येत आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जातं आहे. इच्छुक उमेदवार rect.crpf.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज दाखल करु शकतात.अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज दाखल करण्यासाठी 15 फेब्रवारी शेवटची तारीख असून त्यानंतर उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार नाही.
पदाचे नाव : कॉन्स्टेबल
शैक्षणिक पात्रता
या भरतीसाठी पात्र उमेदवाराने कोणत्याही मान्यता प्राप्त संस्था किंवा विद्यापिठातून दहावी पास असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
सीआरपीएफ कॉन्स्टेबल भरतीच्या अधिसूचनेनुसार, या भरतीसाठी पात्र उमेदवाराचं वय किमान 18 वर्षात आणि कमाल 23 वर्ष आवश्यक आहे.
पगार किती मिळेल?
सीआरपीएफ भरतीअंतर्गत निवड झालेल्या उमेदवाराला 21 हजार 700 रुपये ते 69 हजार 100 रुपये यादरम्यार पगार मिळेल.
निवड प्रक्रिया
बायोमेट्रिक पडताळणी
दस्तऐवजीकरण
शारीरिक मानक चाचणी (PST)
संबंधित क्रीडा विषयातील क्षेत्रीय चाचण्या
वैद्यकीय तपासणी
उमेदवारांचे मूल्यमापन त्यांच्या क्रीडा कामगिरी आणि शारीरिक मानके पूर्ण करण्याच्या क्षमतेवर आधारित केले जाईल.
Discussion about this post