मुंबई । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2024-25 या आर्थिक वर्षासाठी अंतरिम अर्थसंकल्प मांडला असून यावेळी घरे बांधण्यापासून ते वीज मोफत देण्यापर्यंतच्या घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत. या अर्थसंकल्पावर वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली आहे. या बजेटवरून त्यांनी मोदी सरकारला तीन प्रश्न विचारून घेरलं आहे.
वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करून मोदी सरकारला घेरलं आहे. हे सरकार केवळ ज्ञान देतंय. पण, भारतीय युवा, गरिब, महिला आणि शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली आहे. वित्त मंत्र्यांनी केवळ स्वतःची पाठ थोपटून घेण्यात आणि खोटे बोलण्यात धन्यता मानली आहे, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. तसेच मोदी सरकारच्या काळात उद्योजक सोडून गेल्याच्या मुद्द्यावरूनही आंबेडकर यांनी घेरलं आहे.
आंबेडकर यांचे तीन सवाल कोणते?
१. जर अर्थव्यवस्था चांगली असेल, तर मागच्या 9 वर्षांत 12,88,293 अती श्रीमंत व्यक्ती आणि उद्योजकांनी देश का सोडला? ”वायब्रंट गुजरात” मधील 7,25,000 लोकांनी बेकायदेशीर रित्या अमेरिकेत घुसण्याचा प्रयत्न का केला?
२. वास्तविक सरासरी उत्पन्नात 50% वाढ झाली या माहितीचा स्त्रोत काय?
३. पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या आणि दिलेली माहिती शंकास्पद आहे.















Discussion about this post