छत्रपती संभाजीनगर : सध्या महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीची धूम सुरु असून उमेदवाराच्या प्रचार सभेला वेग आला आहे. याच दरम्यान संभाजीनगरातील महायुतीचे मंत्री संदिपान भुमरे यांच्या प्रचारसभेत बोलताना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांची जीभ घसरली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर टीका करताना त्यांनी थेट शिवराळ भाषेचा वापर केला.
यावेळी बोलताना त्यांनी आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली. तसेच ठाकरेंच्या शिवसेनेवर बोलताना त्यांची जीभ घसरली. मुख्यमंत्री अनेकदा म्हणाले जो राम का नही वो किसी काम का नही. जा भो*** असं संजय शिरसाट जाहीर सभेत म्हणाले. विशेष म्हणजे माझी जिभ घसरली. माध्यमं काहीही वृत्त देतील, असंदेखील शिरसाट म्हणाले.
संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?
मी खैरे यांची मिरवणूक पाहिली. मला या सभेत अनेक वेगवेगळे चेहरे दिसली. गेल्या चाळीस वर्षांत मी हे चेहरे पाहिले नव्हते. ही रॅली पाहून मला दु:ख होत होतं. ही कसली रॅली, असा प्रश्न मला पडत होता. जय भवानी, जय शिवाजी अशा घोषणा देत आमची रॅली निघायची. गर्व से कहो हम हिंदू हैं, असं आम्ही म्हणायचे. पण आता त्या रॅलीत सगळेच दिसत आहेत. काय चाललंय हे मला सजत नाहीये.
जो राम का नही, वो…
आमच्याकडे मु्स्लीम बांधव आहेत. ते आमच्या खांद्याला खांदा लावून काम करतात. वेळेनुसार बदलणारी औलाद आम्हाला नको आहे. लाचारी कशासाठी करायची. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक घोषणाच केली आहे. जो राम का नही, वो किसी काम का नही, जाओ भो***. जीभ घसरली. हे टीव्हीवाले नंतर काहीही म्हणतील. पुढे बोलताना त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावरही टीका केली.जे महाराष्ट्राचे नेतृत्व करायला निघालेत ते काल पडले. पायाला मार लागला म्हणून ते त्यांनी आज सगळे कार्यक्रम रद्द केले, अशी बोचरी टीका संजय शिरसाट यांनी केली.
Discussion about this post