मुंबई । राज्य सरकारने पोलीस भरतीत ११ महिने कंत्राटी पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, कंत्राटी भरतीवरुन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारकडे मोठी मागणी केली.
सरकारने घेतलेल्या पोलीस भरतीत ११ महिने कंत्राटी पद्धतीचा निर्णय घेतला मात्र या नंतर ह्या मुलांनी काय करायचं असा प्रश्न आहे, असे म्हणत कायमस्वरुपी भरती घ्या.. अशी मोठी मागणी शरद पवार यांनी केली. तसेच दत्तक घेतलेल्या शाळेत गौतमी पाटीलचा कार्यक्रम झाला आहे. सरकारने शाळा दत्तक देण्याचा निर्णय घेतला आहे. २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद केल्या जात आहेत, असे पवार यावेळी म्हणाले.
राज्यामध्ये महिला बेपत्ता होण्याचे प्रमाण सर्वाधिक असून कायदा व सुव्यवस्थेबाबत राज्य सरकार गंभीर नाही, अशीही शरद पवार यांनी व्यक्त केली. तसेच राज्यातील वाढत्या गुन्हेगारीवरुनही त्यांनी राज्य सरकारला खडेबोल सुनावले. वायबी- चव्हाण सेंटवरवरील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
Discussion about this post