धुळे : धुळे शहरातून एक दुर्दैवी घटना समोर आलीय. सुनेला वाचवताना सासूचाही शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना शहरातील साक्री रोडवरील जय बजरंग सोसायटीमध्ये घडली. सासू आणि सुनेचा एकाच वेळी अंत्ययात्रा निघाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होतं आहे.
नेमकी घटना काय?
याबाबत अधिक असे की, जय बजरंग सोसायटीतील शोभाबाई कृष्णा झीने (वय ३५) यांना कपडे धुताना विजेच्या तारेमुळे शॉक लागला. त्यांचा आवाज ऐकून बाहेर आलेल्या सासू रुखमाबाई झीने (वय ६५ ) यांनाही तारेचा स्पर्श झाल्यामुळे दोघींचा जागीच मृत्यू झाला होता. बुधवारी रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती.
मृत रुखमाबाई यांचा लहान मुलगा पीरन एसआरपीएफमध्ये असून तो पश्चिम बंगालमध्ये बंदोबस्तावर होता. विमान व रेल्वेने तो गुरुवारी दुपारी आला. त्यानंतर दोघांची सोबत अंत्ययात्रा निघाली . सायंकाळी सव्वा पाच वाजेच्या सुमारास कुमार नगर येथील स्मशानभूमीत दोघांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार झाले.
. मृत शोभाबाई यांच्या पश्चात दोन मुले आहे. त्यापैकी एक बारावीला तर दुसरा दहावीला आहे.
Discussion about this post