छत्रपती संभाजीनगर | छत्रपती संभाजीनगरमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. मुलाचं भलं व्हावं, धनलाभ व्हावा यासाठी जन्मदात्या आईने मुलगी झोपलेली असताना तिच्या अंथरूणावर पेट्रोल टाकून तिला पेटवून तिचा नरबळी देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पार्वती दादासाहेब हुलमूख (वय ४०, राहणार गल्ली क्रमांक एक फुलेनगर आंबेडकर नगर) असं मुलीचा नरबळी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या आईचं नाव आहे. तर, शकुंतला अहिर राहणार मिसरवाडी असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहे. २ वर्षीय पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार तिच्या वडिलांचं बारा वर्षांपूर्वी निधन झालं. ती तिच्या आई आणि भावासोबत आंबेडकर नगर परिसरामध्ये राहते.
तिची आई पार्वतीचा गेल्या काही दिवसांपूर्वी जादूटोण्याचा प्रयोग करणाऱ्या शकुंतला अहिरशी संपर्क झाला. यावेळी तुझ्या मुलाचं भलं करायचा असेल आणि तुला धनलाभ करून घ्यायचा असेल, तर तुला तुझ्या मुलीला जिवंत मारून टाकावे लागेल, असं शकुंतलाने पार्वतीला सांगितलं. दरम्यान, १६ ऑगस्ट रोजी रात्री मुलगी घराच्या वरच्या मजल्यावर असलेल्या कुलीमध्ये एकटी झोपलेली होती. तिची आई आणि भाऊ खालच्या मजल्यावर झोपलेले होते.
यावेळी १७ ऑगस्ट रोजी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास तिची आई वरच्या मजल्यावर आली आणि मुलीच्या अंथरुणावर पेट्रोल टाकून तिला पेटवून देण्याचा प्रयत्न केली. त्यानंतर ती खाली आली. आईने पेट्रोल ओतून पेटवताच मुलीला जाग आली, तिने पटकन अंगावरील गोधडी फेकून दिली आणि आरडाओरड करत खाली आली. यावेळी तिची आई खालीच होती मात्र तिने कुठलीच मदत केली नाही. तर ज्या भावासाठी आईने हे सारं केलं, त्याच भावाने स्वत:च्या अंगावरील गोधडीने बहिणीच्या अंगाला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला.
Discussion about this post