सोशल मीडियावर आपल्याला अनेक अपघाताचे व्हिडिओ पाहायला मिळतात. मात्र आता काळीज पिळवटून टाकणारा धक्कादायक प्रकार तामिळनाडूची राजधानी चेन्नईच्या एमएमडीए कॉलनीतून समोर आला आहे. यात शाळकरी मुलीवर भटक्या गाईने हल्ला केला आहे. या घटनेचा भयानक व्हिडिओ समोर आला आहे
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मुलगी आपल्या आईसोबत शाळेतून घरी येत आहे. अचानक गल्लीतील गाई तिच्यावर हल्ला चढवते. अचानक झालेल्या हल्ल्याने मुलीची आई घाबरून जाऊन आरडा- ओरडा करते, मात्र गाई कोणालाच जवळ येवू देत नाही. गाईचा हल्ला इतका भयंकर आहे की मुलीला थेट शिंगावर उचलून फेकते.
https://twitter.com/AjayTweets07/status/1689515481789878272
गल्लीत असलेले अनेक जण या मुलीला वाचवण्याचा प्रयत्न करतात. मात्र खवळलेली गाई चिमुकलीला अक्षरशः तुडवून तुडवून हल्ला करताना दिसत आहे. लोकांच्या बऱ्याच प्रयत्नानंतर गाई मुलीला सोडते. ज्यानंतर सर्वजण मुलीला उचलून घेवून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करतात.
मुलीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिला जवळच्या रुग्णालयात नेले. मुलाच्या आईच्या तक्रारीनंतर आणि पुढील तपासानंतर गाईच्या 26 वर्षीय मालकाला अटक करण्यात आली आहे.
Discussion about this post