जळगाव : कापूस म्हणजे शेतकऱ्याचं पांढरं सोनं मानलं जातं. पण या पांढऱ्या सोन्याला हल्ली भाव मिळत नसल्याने शेतकऱ्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. दरम्यान, राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरु असून या अधिवेशनात कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा विचार व्हावा. त्यांच्यासाठी ठोस निर्णय व्हावा, अशी मागणी जळगावच्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.
सलग दोन ते तीन वर्षापासून कापसाला भाव नसल्यामुळे संकटात सापडलेल्या राज्यातल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने बाहेर काढावे. तीन वर्षांपासून वेगवेगळ्या समस्या अडचणींचा सामना करणाऱ्या कापूस उत्पादक शेतकऱ्याला संकटातून बाहेर काढण्यासाठी महायुती सरकारने अधिवेशनात ठोस निर्णय घेण्याची अपेक्षा सरकारकडून शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
खानदेशात कापूस लागवडीमध्ये मोठी घट
हिवाळी अधिवेशन संपायला आले. मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर, कापसावर बोलायला सरकारमधील कुणी मंत्री तयार नसल्याची नाराजी शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. खत, बियांन्यांचे वाढलेले दर, कापसाला भाव नाही तर दुसरीकडे नुकसान, यामुळे यंदा खानदेशात कापूस लागवडीमध्ये 25 ते 30 टक्क्यांपर्यंत घट झाली आहे.
Discussion about this post