भुसावळ : जिल्हा पोलीस दलातून एक मोठी बातमी आहे. भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याचे हवालदाराला कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांनी गुरुवारी तडकाफडकी निलंबित केले आहे. सुनील जोशी यांना असं निलंबित केलेल्या पोलीस हवालदाराने नाव आहे.
या कारवाईने जळगाव जिल्हा पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली. मारहाणीच्या प्रकरणात संशयित आरोपीसोबत जोशी यांचे संभाषण झाले होते व त्याबाबतची ऑडिओ क्लीपही व्हायरल झाली होती. ही क्लीप पोलिस दलापर्यंत पोहोचल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिस अधीक्षक एम.राजकुमार म्हणाले.
Discussion about this post