नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. यात काँग्रेसला केवळ 16 च जागा जिंकता आल्या. या पराभवाची जबाबादरी स्वीकारत काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा नाना पटोले यांनी दिला होता. आता हा राजीनामा मंजूर करण्यात आला. आता या पदावर कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष लागले असून अशातच माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची निवड निश्चित मानली जात आहे. त्यांच्या नावावर शिक्कामोर्तबही झाल्याची माहिती दिली जात आहे.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-शिवसेना (ठाकरे गट)-राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं होतं. पण, विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षित असे यश मिळाले नाही. इतकेच नाहीतर अनेक दिग्गज नेतेमंडळींचा या निवडणुकीत पराभव झाला. या पराभवाची जबाबदारी स्वीकारत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा देण्याची तयारीही दर्शवली होती. मात्र, त्यावेळी हा राजीनामा झाला नाही.
पण, आता त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. याच पदावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, ऐनवेळी सपकाळ यांचे नावे पुढे आले असून, निवडही केली गेल्याचे सांगण्यात आले आहे.
Discussion about this post