लातूर । राज्यातील २९ महापालिका निवडणुकांचे निकालाचे कल हाती येऊ लागले असून राज्यातील बहुतेक महापालिकांच्या मतमोजणीत भाजप आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, लातूर महानगरपालिका अपवाद ठरली आहे.
लातूर महानगरपालिका काँग्रेस-वंचितने विजयाचा गुलाल उधळला आहे. काँग्रेस पक्षाने ३७ तर वंचित बहुजन आघाडीने सर्व पाच जागांवर आघाडी घेतली आहे. भाजपसाठी हा धक्का असून काँग्रेस-वंचित आघाडीने बहुमताच्या दिशेने वाटचाल केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील असे वादग्रस्त विधान केले होते. याचा फटका भाजपला बसल्याचे दिसते आहे.















Discussion about this post