सोलापूर । ऐन विधानसभा निवडणुकीच्या मतदानादिवशी महाविकास आघाडीतील बेबनाव उघडकीस आला असून शेवटच्या क्षणी काँग्रेसने उद्धव ठाकरेंना धक्का दिला आहे.
सोलापुरातील रामटेक मतदारसंघात महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांनी विशाल बरबटे यांना उमेदवारी दिली आहे. मात्र या मतदारसंघात इच्छुक काँग्रेस नेते राजेंद्र मुळक यांनी बंडखोरी करून अपक्ष अर्ज भरला. विशेष म्हणजे मुळक यांच्या प्रचारासाठी स्थानिक काँग्रेस खासदार, नेत्यांपासून सगळेच प्रचारात दिसून आले. मतदानाच्या आदल्यादिवशी माजी मंत्री आणि काँग्रेस नेते सुनील केदार यांनी मतदारांना आवाहन करत अपक्ष उमेदवार राजेंद्र मुळक यांना मत देण्याचं आवाहन केले आहे. त्यामुळे या मतदारसंघात महाविकास आघाडीतील बिघाडी समोर आली आहे.
ठाकरेंनी दिलेल्या उमेदवाराऐवजी काँग्रेसकडून अपक्ष उमेदवाराला जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणी काँग्रेसनं घेतलेल्या यू टर्नमुळे ठाकरेंना फटका बसण्याची दाट शक्यता आहे.
Discussion about this post