नागपूर । महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना नागपूरमध्ये काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांच्या गाडीला ट्रकने धडक दिल्याची घटना घडली. रात्री उशिरा ऑटोमोटिव्ह चौकात हा अपघात घडला. या अपघातात नितीन राऊत थोडक्यात वाचल्याची माहिती समजते. अपघातानंतर पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला.
नितीन राऊत हे उत्तर नागपूरमधून काँग्रेसचे उमेदवार आहेत. अपघातात नितीन राऊत थोडक्यात बचावलेत. अपघातात नितीन राऊत यांच्या वाहनाचं नुकसान झालंय. नितीन राऊत हे सुखरूप असून या अपघात प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. कपिल नगर पोलिसांनी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या अपघाताची चौकशी केली जात आहे.
नितीन राऊत बुधवारी रात्री प्रचारानंतर घरी परतत होते. तेव्हा त्यांची गाडी ऑटोमोटिव्ह चौकात पोहोचली. त्यावेळी एका ट्रकने त्यांच्या कारला मागून धडक दिली. यामुळे गाडीत बसलेल्या नितीन राऊत आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांना धक्का बसला. अपघातात नितीन राऊत यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. गाडीचे किरकोळ नुकसान झाले आहे.















Discussion about this post