नागपूर । लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका अगदी काही महिन्यांवर येऊन ठेपले असून अशात काही पक्षांमध्ये इन्कमिंग वाढलं आहे. भाजपमध्ये येणाऱ्यांची संख्या वाढते आहे. अशातच हिवाळी अधिवेशनादरम्यान हिॅगणघाटचे भाजप आमदार समीर कुणावार यांनी विधानभवनातील पक्ष कार्यालयात भाजपमध्ये प्रवेश केला.
हिंगणघाटमधील या नेत्यांनी आधी उपमुख्यमंत्री, भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर समीर कुणावार यांच्या प्रमुख उपस्थितीत विधानभवन परिसरातच पक्ष प्रवेश झाला. आगामी निवडणुकीची तयारी म्हणून प्रत्येक मतदारसंघात भाजपकडून पक्षप्रवेशावर भर आहे. अशात हिॅगणघाटमधील काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेस शहराध्यक्ष संदीप देरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या या पक्षांतराची जिल्ह्यात चर्चा होतेय.
या नेत्यांनी केला पक्ष प्रवेश
सभापती ललित डगवार, सुशीला लढी, रवींद्र लढी शिवसेना प्रमुख, कमलेश भोयर उपसरपंच साखरा, रमेशराव मडावी सरपंच परडा, संजय शेळकी धपकी यांनी भाजपत प्रवेश केला. सौ. नीता शेळकी सरपंच- धपकी , प्रल्हाद नांदुरकर ग्रामपंचायत सदस्य- परडा, नामदेवराव उमाटे- समुद्रपूर, नारायणराव बादाने- पारोधी, विनायकराव मोंढे- अंतरगाव यांनीही भाजपची वाट धरली आहे. निवडणूकीची तयारी म्हणून भाजपकडून ग्रामीण भागात मिशन पक्षप्रवेश राबवण्यात येतंय. त्याच अंतर्गत हिंगणघाटमधील नेत्यांचे पे पक्ष प्रवेश झाले आहेत.