मुंबई : आज राज्यातील विधान परिषदेच्या ११ जागांसाठी मतदान होणार असून यासाठी १२ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत.यात भाजपने सर्वाधिक पाच उमेदवारांना विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे. याचदरम्यान मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे काँग्रेसच्या वतीनं राज्य निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिण्यात आलं आहे, ज्यामध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांना मतदान करायला देऊ नये अशी मागणी करण्यात आली आहे.
काँग्रेसचं पत्र जसच्या तसं
‘प्रति
मा. निवडणूक अधिकारी
विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक – 2024
विधान भवन मुंबई
विषय – आ. श्री गणपत गायकवाड वि. स. स. यांना मतदानापासून रोखण्याबाबत
महोदय,
विधानसभा सदस्य श्री गणपत गायकवाड हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. The representation of people act.1951 सेक्शन 62 (5) नुसार ते मतदानाचा हक्क बजावू शकत नाही. विधान सभा सदस्य श्री. गणपत गायकवाड हे मतदान करणार असल्याचे समजते. कृपया त्यांना अवैध मतदान करण्यापासून रोखावे आणि The representation of people act.1951 सेक्शन 62 (5) नुसार कोणत्याही दबावात न येता संवैधानिक मुल्यांचे रक्षण करावे. अन्यथा आपण श्री गणपत गायकवाड यांना मतदान करू दिल्यास आम्हाला कायदेशीर बाबींचा अवलंब करावा लागेल
धन्यवाद’
असा मजकूर या पत्रात आहे. हे पत्र अभिजित वंजारी यांनी निवडणूक आयोगाला पाठवलं आहे. दरम्यान आता काँग्रेसच्या पत्रानंतर या प्रकरणात निवडणूक आयोग केंद्रीय निवडणूक आयोगाचा सल्ला घेणार आहे.
Discussion about this post