मुंबई- शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर आक्षेपार्ह टीका केली होती. आता भाजप खासदाराचीही जीभ घसरली आहे. राहुल गांधी यांची जीभ छाटायला नाही पाहिजे, तर त्यांच्या जीभेला चटके द्यायला हवेत, असं वादग्रस्त वक्तव्य भाजप खासदार अनिल बोंडे यांनी केलं आहे.
शिवसेना नेते संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. ‘जो राहुल गांधीची जीभ छाटेल त्याला ११ लाखांचे बक्षीस देणार’ असं वक्तव्य गायकवाड यांनी केलं, त्यानंतरही बराच गदारोळ झाला. मात्र हे कमी की काय म्हणून आता भाजप खासदार अनिल बोंडे यांनी ‘राहुल गांधींची जीभ छाटू नये,त्यांच्या जिभेला चटके द्यायला हवे’ असं वादग्रस्त वक्तव्य केलं असून या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
नेमकं काय म्हणाले अनिल बोंडे?
राहुल गांधी आरक्षणासंदर्भात जे बोलले ते अतिशय भयानक आहे. विदेशात जाऊन वात्रटासारखं कोणी बोलत असेल तर त्यांची ‘जीभ छाटू नये जिभेला चटके मात्र दिले पाहिजे’ अशा लोकांच्या जिभेला चटके देणे आवश्यक आहे ‘ अशी टीका अनिल बोंडे यांनी केली आहे. राहुल गांधी, ज्ञानेश महाराव असो अथवा श्याम मानव असोत असे म्हणत भाजप खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी ज्ञानेश महाराव श्याम मानव यांच्यावरही टीका केली. ‘ भारतामधील बहुसंख्यांकांच्या भावना जे दुखावतात त्या लोकांना किमान जाणीव तरी करून द्यायला हवी म्हणून ‘जीभ छाटू नये तर जिभेला चटके’ मात्र निश्चितच दिले पाहिजे’ असा पुनरुच्चार डॉ. अनिल बोंडे यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वादंग निर्माण होण्याची चिन्हं आहेत.















Discussion about this post