मुंबई । राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राजकारणामध्ये मोठी उलथापालथ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. कालच काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. आता आणखी एका बड्या नेत्याने काँग्रेसचा हात सोडला असल्याची माहिती समोर आली आहे.
रायगड जिल्ह्यात काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे सुपुत्र प्रवीण ठाकूर काँग्रेसमधून बाहेर पडणार असल्याची माहिती समोर आली आहे. प्रवीण ठाकूर हे काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आहेत. ते आज (२ ऑगस्ट) अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे कोकणात काँग्रेसला मोठा हादरा बसला आहे.
काँग्रेस पक्षात नाराज असल्याचे प्रवीण ठाकूर यांनी म्हटले आहे. ‘माझ्या वडिलांवर अन्याय झाला आहे. पक्षातून जनतेचे प्रश्न सुटत नसल्याची तक्रार त्यांनी केली. यामुळेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला’, अशी माहिती प्रवीण ठाकूर यांनी दिली. यामुळे रायगडमधील उरल्या-सुरल्या काँग्रेस पक्षाला धक्का बसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
Discussion about this post