जळगाव । उत्तर भारतामधून येणाऱ्या थंडी वाऱ्यामुळे महाराष्ट्र गारठला असून आज मध्य महाराष्ट्रात थंडीच्या लाटेचा अंदाज असल्याने हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे. उर्वरित राज्यात हुडहुडी कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढू लागला असून, अनेक ठिकाणी थंडी दिवस अनुभवायला मिळत आहे. काल म्हणजेच रविवारी परभणी येथील नीचांकी ५.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. धुळे येथे ५.८ अंश सेल्सिअस, निफाड येथे ६.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. दरम्यान, पुणे, जळगाव, मालेगाव, परभणी, अमरावती, नागपूर, यवतमाळ येथे ९ अंशांपेक्षा कमी असून नाशिक, भंडारा, वर्धा येथे १० अंश व त्यापेक्षा कमी तापमानाची नोंद झाली.
या जिल्ह्यांना अलर्ट
आज मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांत थंडीची लाट येण्याची शक्यता असल्याने येलो अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात थंडीचा कडाका कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
राज्यातील कुठल्या जिल्ह्यात किती तापमान?
धुळे : ५.८
अहिल्यानगर: ६.५
पुणे: ८.४
जळगाव: ९.०
कोल्हापूर: १४.८
महाबळेश्वर: १२.०
मालेगाव: ८.२
नाशिक: ९.२
सांगली: १२.९
सातारा: १२.८
सोलापूर: १३.६
छत्रपती संभाजीनगर: १०.२
परभणी: ८.९
बीड: ८.९
अकोला: १०.१
अमरावती: ९.०
बुलढाणा: १२.२
गोंदिया: ८.०
नागपूर: ८.२
वर्धा: ९.४
यवतमाळ: ८.५















Discussion about this post