भुसावळ : उन्हाळी हंगामात वाढणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन कोइम्बतूर ते जयपूर दरम्यान अतिरिक्त साप्ताहिक विशेष गाडी चालविण्यात येणार आहे. या निर्णयामुळे दक्षिण भारत आणि राजस्थानकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, या विशेष गाडीच्या एकूण १८ फेऱ्या होणार आहेत. गाडी क्रमांक ०६१८१ कोइम्बतूर–जयपूर ही गाडी ९ एप्रिल ते ४ जून या कालावधीत दर गुरुवारी दुपारी २:३० वाजता कोइम्बतूर येथून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी दुपारी १:२५ वाजता जयपूर येथे पोहोचेल.
तसेच गाडी क्रमांक ०६१८२ जयपूर–कोइम्बतूर ही गाडी १२ एप्रिल २०२६ ते ७ जून २०२६ या कालावधीत दर रविवारी रात्री १०:०५ वाजता जयपूर येथून सुटेल आणि चौथ्या दिवशी सकाळी ८:३० वाजता कोइम्बतूर येथे पोहोचेल.
या विशेष गाडीला भुसावळ, जळगाव, नंदुरबार, अकोला, मलकापूर, नांदेड, निजामाबाद, वडोदरा आणि अजमेर या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे.
या निर्णयामुळे भुसावळ व जळगाव परिसरातील प्रवाशांना दक्षिण भारत आणि राजस्थानकडे थेट प्रवासाचा अतिरिक्त पर्याय उपलब्ध होणार असून उन्हाळी सुट्ट्यांमधील गर्दी कमी करण्यास मदत होणार आहे.















Discussion about this post