भुसावळ : प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने कोइम्बतूर-जयपूर-कोइम्बतूरदरम्यान विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे.विशेष या गाडीला जळगावसह भुसावळ स्थानकावर थांबा असल्याने जिल्ह्यातील प्रवाशांना दिलासा मिळाला.
गाडी क्रमांक ०६१८१ कोइम्बतूर-जयपूर विशेष गाडी ७ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान दर गुरुवारी कोइम्बतूर येथून पहाटे २:३० वाजता सुटेल आणि जयपूर येथे शनिवारी दुपारी १:२५ वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०६१८२ जयपूर-कोइम्बतूर विशेष गाडी १० ऑगस्ट ते ७सप्टेंबरदरम्यान दर रविवारी रात्री १०:०५ वाजता सुटेल आणि कोइम्बतूर येथे बुधवारी सकाळी ८.३0 वाचना पोहोचेल.
या गाडीला तिरुपूर, इरोड, सालेम, जोलारपेट्टी, काटपाडी, रेणुगुंता, कडापा, येरगुंतला, गुटी, ढोणे, करनूल सिटी, गडवाल, मेहबूबनगर, काचीगुडा, कामारेड्डी, निजामाबाद, बासर, मुदखेड, हजूर साहिब नांदेड, पूर्णा, हिंगोली डेक्कन, वाशिम, अकोला, भुसावळ, जळगाव, नंदुरबार, उधना, भरूच, वरोदरा, गोधरा, रतलाम, जावरा, मंदसोर, निमच, चितोरगढ, चंदेरिया, भिलवाडा, बजरंगनगर, नाशिराबाद, अजमेर आणि किशनगढ या ठिकाणी थांबे आहेत. या विशेष गाड्यांमध्ये वातानुकूलित, स्लीपर आणि सामान्य द्वितीय श्रेणीचे मिळून १८ डब्बे असतील
Discussion about this post