कोचिन शिपयार्ड लिमिटेडने भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागितले जात आहे. स्काफोल्डर (Scaffolder), मेकॅनिक पदासाठी ही भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
चौथी पास ते दहावी पास तरुणांनी या नोकरीसाठी अर्ज करायचा आहे.या भरतीबाबत सर्व माहिती कोचिन शिपयार्डच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
तुम्ही cochinshipyard.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ नोव्हेंबर २०२४ आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी मुदतीपूर्वी अर्ज करावेत.
मेकॅनिक पदासाठी १० पास उमेदवार अर्ज करु शकतात. स्काफहोल्डर पदासाठी चौथी पास उमेदवारदेखील अर्ज करु शकतात. नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना कामाचा अनुभव असायला हवा. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ३० वर्ष असावी. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला cochinshipyard.in या वेबसाइटवर जायचे आहे. त्यानंतर करिअर या सेक्शनवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर वन टाइम रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचे आहे. यानंतर तुमचा अर्ज सबमिट करायचा आहे.















Discussion about this post