कोल इंडिया लिमिटेडमध्ये भरती निघाली असून नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना ही मोठी संधी आहे. कोल इंडिया लिमिटेडमध्ये मॅनेजमेंट ट्रेनी पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया २९ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ नोव्हेंबर २०२४ आहे.या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
कोल इंडियामधील या नोकरीबाबत सर्व माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्हाला www.coalindia.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे.
कोल इंडिया लिमिटेडमधील नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली असून पुढच्या महिन्याभरात तुम्ही अर्ज करु शकतात. एकूण ६४० रिक्त पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. मायनिंगमध्ये २६३ रिक्त जागा आहेत. सिविलसाठी ९१ रिक्त जागा आहेत. इलेक्ट्रिकलसाठी १०२ रिक्त पदे आहेत.मेकॅनिकलसाठी १०४ रिक्त पदे आहेत.
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ३० वर्ष असायला हवी. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.या नोकरीसाठी अर्ज करण्याआधी तुम्ही अधिसूचना वाचून घ्या. ()
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने बीई/ बीटेक केलेले असावे किंवा संबंधित इंजिनियरिंगमध्ये बॅचलर डिग्री असणे आवश्यक आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.