गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या वादग्रस्र महाराष्ट्र केडरच्या IAS पूजा खेडकर यांना आणखी एक मोठा झटका बसला आहे. उत्तराखंडमधील मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री प्रशासन अकादमीने पूजा खेडकरवर मोठी कारवाई केली आहे. अकादमीने महाराष्ट्रातून पूजा खेडकरचा प्रशिक्षण कार्यक्रम रद्द केला आहे.
पूजा खेडकर यांचा प्रशिक्षण कालावधी रद्द झाल्यानंतर लगेच ईशासकीय विश्रामगृहात दाखल झाल्या आहेत. पाच वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात असायच्या मात्र आज लवकरच बाहेर पडल्या. पूजा खेडकर यांना कोणत्याही परिस्थितीत 23 जुलै पर्यंत मसूरी येथील प्रशिक्षण केंद्रात रिपोर्टिंग करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
प्रकरण काय?
पूजा खेडकर यांनी पुण्याात केबिनसाठी आणि वाहनावर महाराष्ट्र शासन आणि लाल दिवा लावल्याने त्या अडचणीत आल्या होत्या. त्यासोबत खेडकर यांनी युपीएससी परीक्षेसाठी प्रमाणपत्रे सादर केली होती. दिव्यांग किंवा ओबीसी आरक्षणाचा त्यांनी काही फायदा घेतलेला यावरून आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. त्यानंतर केंद्र सरकारने अतिरिक्त सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून एक समिती स्थापन केली आहे. चौकशी सुरू असून या समितीचा अहवाल अद्याप आलेला नाही मात्र आता त्यांचं प्रशिक्षण थांबवलं गेल्याने खेडकर यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
Discussion about this post