सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे.सीएनजीच्या दरात २ रुपयांनी वाढ झाली असून यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणार आहे. सीएनजीच्या दरात वाढ झाल्याने आता रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात वाढ करण्याची मागणी केली जात आहे. ()
सीएनजीच्या किंमतीत वाढ झाली आहे. याआधी सीएनजी ७५ रुपये प्रति किलो असं विकलं जात होतं. परंतु आता सीएनजीची किंमत ७७ रुपये प्रति किलो झाली आहे. सध्या देशातील सार्वजनिक वाहतुकीची वाहने , रिक्षा, टॅक्सी सर्वाधिक सीएनजी गॅसवर चालत आहे. त्यामुळे भाड्यात वाढ करण्याची मागणी रिक्षाचालक आणि टॅक्सी संघटनांनी केली आहे.सीएनजीच्या किंमती वाढल्यानंतर रिक्षाच्या भाड्यात २ रुपयांनी वाढ व्हावी, अशी मागणी करण्यात येत आहे. मुंबईच्या रिक्षाचालक संघटनांनी ही मागणी केली आहे.
सीएनजी गॅसमुळे वाहनधारकांची जवळपास ४९ आणि १४ टक्के बचत झाली आहे. पेट्रोल डिझेलच्या किंमतीच्या तुलनेत सीएनजी गॅसची किंमत कमी आहे. त्यामुळे सर्वाधिक वाहने ही सीएनजी गॅसवर चालत आहे. त्यामुळे रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात वाढ केली जाण्याची शक्यता आहे.
Discussion about this post