पुणे । पुण्यात गर्भवती महिला तनिषा सुशांत भिसे यांच्या मृत्यूनंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर गंभीर आरोप झाले आहे. गरोदर महिलेच्या मृत्यूनंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाविरोधात राजकीय पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्या प्रकारावरुन मंगेशकर रुग्णालयाची चौकशी सुरु झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पुन्हा यासंदर्भात महत्वाचे वक्तव्य केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘ भिसे कटुंबीयांनी माझी भेट घेतली आहे. मी त्यांना आश्वस्त केललं आहे की, फक्त या प्रकरणासाठी कारवाई करायची नाही. तर भविष्यात पुन्हा ही बाब होऊ नये, यासाठी काय काळजी घ्यावी, या दृष्टीने कारवाई करत आहोत. कमिटी सर्व प्रकारच्या गोष्टीत लक्ष घालणार आहे. या प्रकरणातील दोषींना शिक्षा झाली पाहिजे. भविष्यात अशा घटना घडू नये, या दृष्टिकोनातून आमचा विचार आहे. त्यावर आम्ही काम करू’. असं मुख्यमंत्री म्हणाले आहे. हे.
अहवाल आल्यावर गुन्हा दाखल करणार
अधिवेशनात कायद्यात बदल करण्यात आले आहे. काही अधिकार धर्मादाय आयुक्तांना दिले आहे. सर्व धर्मादाय व्यवस्था ऑनलाईन करणार आहोत. मुख्यमंत्री कार्यालयातील आरोग्य कक्षसुद्धा धर्मदाय आयुक्तांना जोडला जाणार आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे मंगेशकर कुटुंबियांनी खूप मेहनतीतून उभारले आहे. त्यात अनेक उपचार होतात. सर्व चूक रुग्णालयाची नाही. परंतु कालचा प्रकार असंवेदनशील होता. जोपर्यंत आम्ही नेमलेल्या समितीचा अहवाल येत नाही, तोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही. कालचे आंदोलन जनआक्रोश होता. आज ‘शोबाजी’ केली जात आहे, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात शनिवारी आंदोलन करणाऱ्यांना लगावला.
Discussion about this post