मुंबई : महाराष्ट्रातील बारावीच्या परीक्षेचा निकाल कधी जाहीर होणार याकडे विद्यार्थ्यांसह पालकांची उत्सुकता लागली होती. अखेर निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. बारावीच्या परीक्षेचा निकाल गुरुवार, 25 मे 2023 रोजी जाहीर होणार आहे. बारावीचा निकाल उद्या दुपारी दोन वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे.
बारावी नंतर पुढे काय? याचा निर्णय बारावीच्या निकालांवर अवलंबून असल्याने विद्यार्थी या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. बारावीनंतरच्या शैक्षणिक वाटचालीसाठी हा निकाल अत्यंत महत्त्वाचा असतो. फेब्रुवारी-मार्च महिन्यात झालेल्या या परिक्षांचा निकाल हा मे महिन्याच्या शेवटपर्यंत जाहीर केला जातो. आता अशातच उद्या म्हणजेच 25 मे रोजी बारावी निकाल जाहीर होणार आहे.
कुठे पाहता येणार निकाल
Maharesult.nic.in
hsc.maharesult.org.in
hscresult.mkcl.org
SMS द्वारे कसा पहाणार निकाल?
SMS द्वारे निकाल मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना मेसेज बॉक्समध्ये जावून आपला सीट नंबर टाकून 57766 या क्रमांकावर सेंड करावा लागणार आहे. यानंतर त्याच मोबाईल नंबरवर तुम्हाला तुमचा निकाल पाहता येईल.
Discussion about this post