जळगाव । डी-मार्ट मध्ये खरेदी करताना दोन ग्राहकांच्या मध्ये धक्का लागल्याच्या कारणावरून जोरदार हाणामारी झाल्याची घटना जळगाव शहरात घडल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेत पोलिसांनी हाणामारी करणाऱ्या दोन्ही परिवारास ताब्यात घेतले आहे. पोलिसांकडून दोघांची चौकशी केली जात आहे.
डी-मार्टमध्ये हाणामारी झाल्याचं कळताच बाहेर मोठा जमाव जमला असल्यानं पोलिसांनी तातडीने मोठा बंदोबस्त तैनात केला. अधिक तणाव निर्माण होण्याची शक्यता पाहता डी मार्ट प्रशासनाने दुकान बंद करणे पसंत केले. या विषयावर डी मार्ट व्यवस्थापक याना विचारले असता त्यांनी दोन ग्राहकांच्या मध्ये हाणामारी झाल्याचं मान्य केले मात्र या पेक्षा अधिक बोलणे टाळले आहे
हाणामारी घटनेनंतर विषय आता पोलीस ठाण्यापर्यंत गेल्याने दोन्ही बाजूंकडून समेट घडवण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र, एका क्षुल्लक घटनेने दोन्ही कुटुंबीयांची चांगलीच शोभा झाली.
Discussion about this post