मुंबई । महायुतीत नाराजी नाट्य चव्हाट्यावर आल्याचे दिसून येत आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री अजित पवार आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यात खडाजंगी झाल्याची माहिती आहे. विकासकामांच्या निधीवरुन दोन्ही नेत्यांमध्ये वाद झाला आहे.
ग्रामविकास विभागाला जास्त निधी द्यावा अशी मागणी गिरीश महाजन यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केली. मात्र गिरीश महाजन यांच्या मागणीनंतर पैसे कोठून आणू. आता काय राज्यातील जमिनी विकायच्या का? असा थेट सवाल अजित पवार उपस्थितीत केला.
यानंतर अजित पवार यांनी सिन्नर तालुक्यात माणिकराव कोकाटे यांच्या मतदारसंघात एका स्मारकसाठी कोट्यावधी निधीच्या तरतुदीचा मुद्दा मांडला. मात्र त्यावेळी पैसे नाहीत म्हणून नको तिथ खर्च करायला नको ही तुमची भूमिका असेल तर या स्मारकासाठी कोट्यवधींचा खर्च कशाला? असा सवाल गिरीश महाजन यांनी उपस्थित केला.
लोकसभेच्या निकालानंतर आता राज्यात आगामी विधानसभेची तयारी सुरू झाली असून महायुतीने सत्ता आपल्याकडे राखण्यासाठी कंबर कसल्याचं दिसून येत आहे. पण निवडणुकीच्या जागावाटपाच्या चर्चांआधीच महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपदावरून वाद असल्याचं दिसून येत आहे.















Discussion about this post