नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी खुशखबर आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) ने कॉन्स्टेबल आणि ट्रेड्समनच्या भरती परीक्षेसाठी अधिसूचना जारी केली आहे. या पदासाठी अर्ज ५ मार्चपासून सुरू झाले आहेत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ एप्रिल आहे. इच्छुक उमेदवार cisfrectt.cisf.gov.in या वेबसाइटवर जाऊन नोंदणी करू शकतात. सीआयएसएफ भरतीद्वारे एकूण १,१६१ रिक्त पदे भरण्यात येणार आहे.
आवश्यक पात्रता आणि वयोश्रेणी
– उमेदवार 10 वी उत्तीर्ण किंवा समकक्ष पात्रता धारक असावा.
– संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय (ITI) उत्तीर्ण उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
– 1 ऑगस्ट 2025 रोजी उमेदवारांचे वय 18 ते 23 वर्षे असावे.
– SC/ST उमेदवारांना 5 वर्षे आणि OBC उमेदवारांना 3 वर्षे वयाची सवलत देण्यात आली आहे.
या भरतीत 1161 पदे उपलब्ध आहेत :
कॉन्स्टेबल (कुक) – 493 पदे
कॉन्स्टेबल (कॉबलर) – 9 पदे
कॉन्स्टेबल (टेलर) – 23 पदे
कॉन्स्टेबल (बार्बर) – 199 पदे
कॉन्स्टेबल (वॉशरमन) – 262 पदे
कॉन्स्टेबल (स्वीपर) – 152 पदे
इतर तांत्रिक पदे – 23 पदे
CISF मध्ये स्थिर आणि प्रतिष्ठित नोकरी मिळवण्याची ही उत्तम संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट cisfrectt.cisf.gov.in वर जाऊन अर्ज करावा.
Discussion about this post