शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र म्हणजे सिडकोअंतर्गत घरे बांधली जातात. महाराष्ट्र शासनाचा हा उप्क्रम आहे. दरम्यान सिडकोमध्ये सध्या विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे.
सिडकोमध्ये सध्या वर्ग १ आणि वर्ग २ मधील रिक्त पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. सहयोगी नियोजनकार या पदासाठी २ जागा रिक्त आहेत. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ६७,७०० रुपये ते २,०८,७०० रुपये पगार मिळणार आहे.
उपनियोजनकार पदासाठी १३ जागा रिक्त आहेत. या नोकरीबाबत सर्व माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ५६,१०० ते १,७७,५०० रुपये पगार मिळणार आहे. यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी ८ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. सिडकोमध्ये कनिष्ठ नियोजनकार पदासाठीही भरती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये १४ रिक्त जागा आहेत. वर्ग २ गटासाठी ही भरती करण्यात येणार आहे. क्षेत्राधिकारी पदासाठीही रिक्त जागा आहे. ९ रिक्त जागांवर ही भरती करण्यात येणार आहे.
या भरतीबाबत सविस्तर जाहिरात www.cidco.maharashtra.gov.in या वेबसाइटवर देण्यात आली आहे. तेथील करिअर सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही या नोकरीबाबत सविस्तर माहिती वाचू शकतात. (CIDCO Job)
अमरावतीत नोकरीची संधी
सध्या राष्ट्रीय आरोग्य अभियानअंतर्गत अमरावती येथेदेखील भरती जाहीर करण्यात आली आहे. १३० पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. डेन्टल सर्जन, फायनान्स ऑफिसर ते फिजियोथेरेपी अशा अनेक पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी तुम्ही ऑफलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात.
Discussion about this post