सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी खुशखबर आहे. सिडको महामंडळात काही रिक्त पदांसाठी भरती सुरु असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. एकूण ३८ रिक्त पदांवर ही भरती जाहीर करण्यात आली असून या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
सिडको महामंडळात डेप्युटी प्लानर पदासाठी १३ जागा रिक्त आहेत. यातील काही जागा राखीव प्रवर्गासाठी रिक्त आहेत.या नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवाराकडे सिव्हिल इंजिनियरिंगची पदवी प्राप्त केलेली असावी. आर्किटेक्चर, प्लानिंग विषयातील पदवी प्राप्त केलेली असावी. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना ५६,१०० ते १,७७,५०० रुपये पगार मिळणार आहे. (CIDCO Recruitment)
ज्युनिअर प्लानर पदासाठी १४ जागा रिक्त आहेत. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर ऑफ प्लानिंग किंवा संबंधित क्षेत्रात पदवी प्राप्त केलेली असावी. या नोकरीसाठी दरमहा ७८,००० रुपये पगार मिळणार आहे.
क्षेत्राधिकारी पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना B. Arch./ G. D. Arch.आणि SAP GLOBAL सर्टिफिकेशन असणे गरजेचे आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे १ वर्षाचा कामाचा अनुभव असायला हवा. (CIDCO Recruitment 2025)
असोसिएट प्लानर पदासाठी २ जागा आहेत. यासाठी उमेदवाराने सिव्हिल इंजिनियरिंग आर्किटेक्चर किंवा प्लानिंगमध्ये पदवी प्राप्त केलेली असावी. या नोकरीसाठी ६७,७०० ते २,०८,७०० रुपये पगार मिळणार आहे.
Discussion about this post