चोपडा । चोपडा तालुक्यात अत्याचार झाल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तालुक्यातील एका गावातील अठरा वर्षीय तरुणीला एकाने जीवेठार मारण्याची धमकी देत तिच्याच घरात अत्याचार केले. त्यानंतर पिडीतेला किनगाव येथे घेवून जात अत्याचार करीत तेथेच सोडून दिले. याठिकाणी तरुणी एकटीच असल्याने दारुच्या नशेत असलेल्या तिघांनी तरुणीवर सामुहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना शनिवारी उघडकीस आली.
याप्रकरणी चौघांविरुद्ध अडावद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
चोपडा तालुक्यातील एका गावात पीडित तरुणी एकटी असतासंना संशयित गफूर गबू तडवी याने दि. ३ जानेवारी रोजी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास पिडीतेचा घरात शिरला. त्याने पिडीतेला ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केले. पुन्हा दुसऱ्या दिवशी तिला यावल तालुक्यातील किनगाव येथे बोलवून घेतले.
त्याठिकाणी सरकारी दवाखान्याचे बांधकाम होत निर्जनस्थळी घेवून जात तेथे पुन्हा अत्याचार केले आणि तरुणीला एकटेच सोडून तो तेथून पसार झाला. दि.४ रोजी रात्रीच्या सुमारास तरुणी एकटीच असल्याचे दिसताच दारुच्या नशेत असलेल्या तिघ अनोळखी इसमांनी तरूणीला सहानुभूती दाखवित तिच्यावर सामुहिक अत्याचार केला. घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या तरुणीने तिच्यावर झालेल्या आत्याचाराची आपबिती आपल्या कुटुंबियांना सांगितली. त्यांनी अडावद पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार गफूर तडवी याच्यासह अन्य तिघांविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.















Discussion about this post