चोपडा । जळगावच्या चोपडा तालुक्यातून अत्याचाराची एक संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. ज्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली. चोपड्यातील जिरायतपाडा गावात लघुशंकेसाठी रात्री घराच्या बाहेर अंगणात गेलेल्या अल्पवयीन मुलीवर पाळत ठेवणाऱ्या गावातील तरुणाने पाशवी अत्याचार केला. याप्रकरणी संशयित तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली.दरम्यान संशयित तरुणाला शनिवारी दुपारी न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
सातपुड्यातील जिरायतपाडा येथे कुटुंबियांसोबत वास्तव्यास असलेली १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी रात्री लघुशंकेसाठी घराच्या बाहेर अंगणात आली असता ती घरात परत आलीच नाही म्हणून मुलीच्या वडिलांनी रात्रभर जिरायतपाडा गावात शोधाशोध केली परंतु ती कुठेच आढळून आली नाही.
आई,वडिलांसह सर्वच कुटुंब चिंतेत असतांना अंधारात अल्पवयीन मुलगी पहाटे चार वाजेच्या सुमारास घाबरलेल्या अवस्थेत रडत घरी परतली. यावेळी वडिलांनी अल्पवयीन मुलीला विचारले असता तिने सांगितले की,लघुशंकेसाठी घराच्या बाहेर अंगणात गेली असता माझेवर पाळत ठेवणाऱ्या गावातील तरुणाने दोन्ही हातांनी माझे तोंड व हात बांधून जबरदस्तीने अंधारात ओढत नेऊन मुलीच्या नातेवाईकाच्या बंद असलेल्या घरात तब्बल पाच तास डांबून ठेवत पहाटे ४ वाजेपर्यंत पाशवी अत्याचार केला. त्यानंतर संशयित तरुणाने मला घरापर्यंत सोडले अशी आपबिती अल्पवयीन मुलीने सांगितली. अत्याचाराच्या घटनेने आदिवासी कुटुंबच हादरले असून,जिरायतपाडा गावात प्रचंड खडबळ उडाली आहे.
या प्रकरणी अल्पवयीन मुलीचे वडिल यांच्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलीस स्टेशनला गुरनं.२१३/२०२५ नुसार भारतीय न्याय संहिता कलम -१३७(२),६४ (२), (i) (m),६५ (१), ११५ (२),३५१(२) पोक्सो३,४(२),५ (L),६,७,८ प्रमाणे स्नेहल दिलीप पावरा रा.जिरायतपाडा याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून,अटक
करण्यात आली आहे.पुढील तपास डीवायएसपी आण्णासाहेब घोलप, ग्रामीणचे पोलीस निरीक्षक महेश टाक यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. शेषराव नितनवरे करीत आहेत.
Discussion about this post