चोपडा | चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तो म्हणजे आदिवासी तरूणांना मारहाण करत त्यांना अश्लील वर्तन करण्यास भाग पाडले. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनच्या उपनिरिक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी ही कारवाई केली.
चोपडा तालुक्यातील एका गावातील आदिवासी समाजातील प्रेम युगुल हे पळून गेले म्हणून मुलीच्या पालकांनी संशय व्यक्त केला म्हणून एक महिला व तरूणासह चौघांना चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात बोलवण्यात आले होते. २२ जुलै रोजी ही घटना घडली होती. तेथे पोलिस उपनिरीक्षक साजन नाहेंडा यांनी या चौघांना मारहाण केली.
त्या नंतर त्यातील तीन तरूणांना अश्लील वर्तन करण्यास भाग पाडले. हा प्रकार चोपडा ग्रामीणचे पोलिस निरीक्षक अनिल भवारी यांना कळल्यानंतर असता त्यांनी पीएसआय नाहेंडा यांना निलंबित करण्याची शिफारस पोलिस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांच्याकडे केली होती.
Discussion about this post