जळगाव । चोपडा तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कमळगावच्या आठवडी बाजारात पाणीपुरी खाल्ल्यामुळे ८० जणांना विषबाधा झाली आहे. काही रुग्णांना चोपडा रुग्णालयात तर काहींना जिल्ह्या रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. सदर घटनेमुळे एकच खळबळ उडाली.
कमळगाव आणि आजूबाजूच्या खेड्यांतील तसेच चांदसणी, मितावली, पिंप्री येथील ग्रामस्थ बाजारासाठी आले असताना तेथील पाणीपुरी विक्रेत्यांकडून अनेकांनी पाणीपुरी खाल्ली तर काहींनी पाणीपुरीचे पार्सल घरी नेले होते. या पाणीपुरी खाल्लेल्यांना मंगळवारी सकाळी उलट्या, जुलाब, पोटात दुखणे असे त्रास जाणवू लागले. यापैकी अनेक रुग्णांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले. परंतु, संध्याकाळी ६ वाजेनंतर अचानक रुग्णांमध्ये वाढ झाली.काही रुग्णांना चोपडा रुग्णालयात तर काहींना जिल्ह्या रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.
घटना समजल्यानंतर चोपडा तालुका गटविकास अधिकारी रमेश वाघ तसेच आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर हे आरोग्य पथकांसह दाखल झाल्यावर उपचारास गती मिळाली. अडावद आरोग्य केंद्रात रुग्णसंख्येत वाढ होताच गावातील ग्रामस्थांनी मदत कार्यासाठी धाव घेतली.















Discussion about this post