जळगाव | चोपडा शिरपुर रोडवरील अकुलखेडा गावा जवळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने गांजा विक्री करणाऱ्या दोघांना गांज्यासह ताब्यात घेतले. त्याच्याकडून ३६ हजार रुपयाचा ४ किलो ५०० ग्रॅम गांजा तसेच २ मोटार सायकल व २ मोबाईल असे एकूण २ लाख ३१ हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकास गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, चोपडा शिरपुर रोडवरील अकुलखेडा गावा जवळ शिरपुर कडून एक इसम मोटार सायकल वर येवून दुसऱ्या इसमास गांजा विक्री करणार आहे अशी माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहिती वरून स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अमंलदार तसेच चोपडा शहर पो.स्टे. अधिकारी व अमंलदार यांनी एकत्रीत येवून चोपडा शिरपुर रस्त्यावर अकुलखेडा गावाजवळ सापळा लावला. शिरपुर कडून येणाऱ्या इसमास व तो विक्री करीत असणाऱ्या इसमास दोघांना ताब्यात घेतले.
आरोपी विजय देवराम मोरे, वय २८, रा.भोरखेडा ता.शिरपुर जि.धुळे, दुसरा आरोपी अविनाश भिका पाटील, वय २६, रा.वाघळुद ता.धरणगाव जि. जळगाव. यांना दोघांना ताब्यात घेवून त्याचे कडून ३६००० रुपयाचा ४ किलो ५०० ग्रॅम वजनाचा गांजा तसेच २ मोटार सायकल व २ मोबाईल असे एकूण २ लाख ३१ हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. त्यांचे विरुध्द चोपडा शहर पो.स्टे. ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई चोपडा शहर पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, सपोनि एकनाथ भिसे, पोउपनिरी गणेश वाघमारे, श्रेपोउनि अनिल जाधव, विलेश सोनवणे, दिपक माळी, रविंद्र पाटील, हेमंत पाटील, प्रदिप व स्थागुशा जळगाव तसेच पोह जितेंद्र चव्हाण, गोकुळ सोनवणे, योगेश बोडखे, विनोद पाटील नेम. चोपडा शहर पो.स्टे. यांनी केली आहे.
Discussion about this post